Khadaki-Bopodi : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वेचा प्रतिसाद – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज : रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी (Khadaki-Bopodi) रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे खडकी -बोपोडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकर सुटायला मदत होईल, अशी अपेक्षा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज व्यक्त केली.

पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांची छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या विविध समस्यांबाबत आमदार शिरोळे यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये वाहतूक आणि रेल्वे या विषयावर चर्चा झाली. खडकी-बोपोडी रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून एलिफिस्टन रोड नजीक रेल्वेचा ट्रॅक जात असल्याने येथे बरीच वाहतूक कोंडी होत असते.

या ट्रॅकजवळील रस्त्याचे लेव्हलिंग करावे, तसेच खडकी रेल्वे अंडरपास याठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होत असते. याकरिता अंडरपासचे रुंदीकरण व्हावे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना केली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पाहाणी करण्यात येईल आणि त्यातून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

Talegaon Dabhade : देशभक्तीपर गीतांवर आधारित समूहनृत्य स्पर्धेला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यावेळी सुनिताताई वाडेकर, पुणे महापालिका पथ विभागाचे अधिकारी (Khadaki-Bopodi) दिनकर गोजारे, खडकी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मासाळकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.