Khadki : स्पीकरचा वाद जीवावर बेतला; अपमानित झाल्याने ज्येष्ठाने संपवले जीवन

एमपीसी न्यूज-स्पीकरवरून निर्माण झालेला वाद एका ज्येष्ठ (Khadki) नागरिकाच्या जीवावर बेतला. या सर्व वादातून अपमानित झाल्याने एका 70 वर्षीय नागिरकाने स्वतःच आयुष्य संपवलं. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला असून याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70, रा. नवी खडकी) असे आयुष्य संपवलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय 47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले (वय 26), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय 18), यश मोहिते (वय 19), शाहरुख खान (वय 26), जय तानाजी भडकुंभे (वय 22) या 5 जणांना अटक केली आहे. हा सर्व प्रकार नवी खडकी येथे 28 मे रात्री घडला.

Supe : सुपे गावातून पावणेचार लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्पीकर लावल्यामुळे त्याठिकाणी मोठा गोंधळ सुरू होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. यावरून आरोपींनी त्यांना अपमानित केले आणि हाकलून दिले.
त्यानंतरही बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे साळुंखे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा असे सांगत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना  लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली.
चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले.  फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. मारहाणीमुळे होणार्‍या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या (Khadki) केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.