Khalapur : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग दुपारी दोन तासांसाठी बंद

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर ओव्हरग्रेड गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे  आज बुधवार ( दि. 23) दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन तासांच्या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

ब्लॉकच्या कालावधीत सर्वच प्रकारची अवजड व मालवाहतूक करणारी वाहने खालापूर व कुसगाव टोलनाक्याच्या अलीकडे थांबविण्यात येणार आहेत; तर हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1