Khalumbre : एटीएम मशीन उचकटून 16 लाख लंपास

एमपीसी न्यूज- गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन उचकटून चोरट्याने एटीएम मशीन मधील 16 लाख रुपये लंपास केले. शनिवारी (दि.30) पहाटे दीड ते चारच्या सुमारास खालुंब्रे येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात ही घटना घडली.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी सचिन शिवकरण काळगे (वय 31, रा.थेरगाव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालुंब्रे येथे स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम केंद्र आहे. शनिवारी पहाटे दीड ते चारच्या सुमारास अज्ञात चोरटा एटीएम केंद्रात आला. एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने उचकटली. त्यातील 15 लाख 94 हजार 100 रुपये चोरून पोबारा केला. तसेच यामध्ये मशीनचे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.