BNR-HDR-TOP-Mobile

Khed: ‘आंबोलीत शनिवारी रंगणार ‘राजकीय इर्जिक’

389
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – किमया कम्युनिकेशनतर्फे येत्या शनिवारी (दि.16) ‘राजकीय इर्जिक’ 2019 यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती किमया कम्युनिकेशनचे संचालक जयंत शिंदे यांनी दिली.

पुणे, खेड तालुक्यातील आंबोली येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘राजकीय इर्जिक’ रंगणार आहे. या परिसवंदाचे उद्‌घाटन राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी स्वराज अभियानाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मानव कांबळे असणार आहेत.

  • यामध्ये शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, पुणे जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खेड तालुकाध्यक्ष जयप्रकाश परदेशी, राष्ट्रवादीचे मुख्य संघटक अरुण बो-हाडे, भीम शक्तीचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस, ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, दैनिक जनशक्तीचे निवासी संपादक अविनाश म्हाकवेकर, द डेमोक्रॅटिक पोस्टच्या संपादिका स्नेहल वरेकर सहभागी होणार आहेत.

सर्वेत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ‘राजकीय इर्जिक’ 2019 या वर परिसंवादामध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे ‘राजकीय इर्जिक’ चांगलेच रंगणार आहे. परिसरातील नागरिकांना या परिसंवादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजक जयंत शिंदे यांनी केले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3