Khed : डुकरांनी भरलेले पिकप जबरदस्तीने पळवले

एमपीसी न्यूज – डुकरांनी भरलेले पिकप सहा जणांनी मिळून (Khed)जबरदस्तीने पळवून नेले. पिकप चालक आणि साथीदाराला आरोपींनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) पहाटे चार वाजता खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली.

राजकुमार महेंद्र रीडलान (वय 31, रा. झेंडेमळा, देहूरोड), समाधान पांडुरंग राठोड (वय 32, रा. निघोजे, ता. खेड), राम मदन मोटे (वय 31, रा. खराबवाडी, ता. खेड), सोमनाथ अंकुश येळवंडे (वय 41, रा. निघोजे, ता. खेड) या चौघांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर संपत साबळे (वय 39, रा. भाऊसिंगपुरा, ता. जि. छत्रपती संभाजी नगर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : जागा मोजून बांधकाम करण्यास सांगितल्याने एकास मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे (Khed)त्यांच्या पिकप (एम एच 20/ईएल 8579) मध्ये कुरुळी येथे डुकरे घेऊन आले होते. डुकरांना मोकळे करण्यासाठी ते रस्त्यावर पिकप उभा करून डुकरांची पाहणी करीत होते.

त्यावेळी स्पायसर चौकाकडून आलेल्या तीन दुचाकीवरील सहा जणांनी फिर्यादी किशोर साबळे व त्यांचे सहकारी यांना लाकडी दांडके आणि लोखंडी टॉमीने मारून जखमी केले. त्यानंतर मोबाईल फोन आणि डुकरांनी भरलेले पिकप असा एकूण नऊ लाख 58 हजारांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पळून गेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.