Khed : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : लग्नाचे खोटे आमिष दाखवून वासुली (ता. खेड) येथील एका (Khed) नराधमाने 33 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकण लगतच्या खराबवाडी येथे ऑगस्ट 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत ही घटना घडली.

महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
खराबवाडी येथील एका पिडीत महिलेने याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, प्रवीण काळे ( रा. वासुली, ता. खेड) याच्यावर भा.द.वि.कलम 376 (2) अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे आरोपी काळे व त्यांची ओळख झाली होती. खराबवाडी गावच्या हद्दीतील सारा वसाहतीमध्ये आरोपी याने पीडित महिलेशी कोणत्या न कोणत्या बहाण्याने ओळख वाढवून फिर्यादीला मला तू खूप आवडते, मी तुझ्या बरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

फिर्यादी महिलेने आरोपी प्रवीण काळे यांच्याकडे लग्न करण्याची विचारणा केली असता त्याने फिर्यादिस प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर आरोपी प्रवीण काळे हा फिर्यादी पीडित महिलेचे फोन घेणे व पीडित महिलेस भेटण्यास (Khed) टाळाटाळ करून तुला काय करायचे ते कर असे बोलू लागला.

Pune Breaking News : पुण्यात मंडपाच्या गोडाऊनला आग; तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

त्यामुळे पीडित महिलेने काळे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महाळुंगे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.