Vadgaon Maval News : गोकुळाष्टमी निमित्त हभप तुकाराम महाराज मुरूमकर यांचे देवजन्माचे कीर्तन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे गोकुळाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. आज (सोमवारी, दि. 30) रात्री 10 ते 12 या वेळेत श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर येथील हभप तुकाराम महाराज मुरूमकर यांचे देवजन्माचे (श्रीकृष्ण) कीर्तन होणार आहे. श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिरात दररोज हरिपाठ, भजन, अखंड विना धारण, काकडा आरती केली जात आहे.

श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे वतीने वर्षभरातील पवित्र मानणाऱ्या श्रावण महिन्यातील गोकुळाअष्टमी उत्सवाचे निमित्ताने श्री हनुमान मंदिरमध्ये रोज हरिपाठ,भजन व  नऊ दिवस अखंड विना धारण व आज 30 ऑगस्ट,सोमवार रात्री 10 ते 12 ह भ प तुकाराम महाराज मुरूमकर (श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर)यांचे  देवजन्माचे (श्रीकृष्ण) किर्तन होणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीमध्ये या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असताना काकडा आरती भजनी मंडळ व ग्रामस्थ यांचे वतीने रोज संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ व रात्री दहा वाजता भजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री पोटोबा देवस्थानचे मुख्यविश्वस्त, सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोक ढमाले,ॲड. तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे,सुभाष जाधव,सुनिता कुडे व पुजारी मधुकर गुरव आदिंनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.