Pune News : जबरी घरफोडी करून 5 लाख 33 हजार किमतीचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : तांदळी गाव शिरूर येथे शनिवारी (दि 28) रात्री साडेआठ ते पहाटे दोन वाजतेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने जबरीने घर फोडून एकूण 5 लाख 33 हजार किमतीचा ऐवज चोरून नेला.

अशोक गदादे (वय 30 रा शिरूर) यांनी रविवारी (दि 29) सकाळी पावणे 9 वाजतेच्या दरम्यान शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे राहते घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील 1 लाख 90 हजार रोख व 3 लाख 43 हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 33 हजारांचा ऐवज लंपास केला. शिरूर पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.