kiwale News: आयटीएन्संनी घेतला फुटबॉल खेळण्याचा आनंद

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते निलेश तरस सोशल  फाउंडेशन आणि तक्षक फुटबॉल क्लब यांच्या सयुंक्त विद्यमाने  दोन दिवसीय फुटबॉल मॅचेस भरवल्या होत्या. यात सर्व  आयटीएन्संनी एकत्र येत फुटबॉलच्या खेळाचा आनंद घेतला.

महान क्रिकेटपटू शेन वार्न यांना श्रद्धांजली देऊन फुटबॉल मॅचला सुरुवात केली. 14 वयोगटात यमुना XI संघ विजेता ठरला.  सर्वाधिक गोल-सुफियान शेख (5 गोल) यांनी केले. मोठ्या गटात अंडरडॉग्स संघ विजेता ठरला. वाकड एफसी संघ उपविजेता ठरला. तर,  उत्कृष्ट रनर – हर्षद राक्षे (स्कोर 6 गोल) केले. फुटबॉल स्पर्धेचे आयोजन तुषार दुडंम आणि अभिषेक पांडे यांनी केले होते. तर, पारितोषिक वितरण निलेश तरस,सोशयल युथ फौंडेशनने दिले.

स्पर्धेचे आयोजक तुषार दुडंम आणि अभिषेक पांडे म्हणाले, गेली दोन वर्षे टाळेबंदीत आयटीहब किंवा खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या कामाचा थेट परिणाम शरीराच्या स्वास्थ्यशी निगडित असल्याने कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी अगदी मेटाकुटीला आले होते. त्यासाठी दोन दिवसीय फुटबॉल मॅचेस भरवल्या. यात सर्व  आयटीएंस एकत्र येऊन फुटबॉल च्या खेळाचा आनंद घेण्यासाठी एकत्र आले. या खेळात महिला आणि पुरुष यांच्या फुटबॉल मॅच चे आयोजन देहूरोडच्या रावेत येथील बंदिस्त मैदानावर घेण्यात आले. दोन वर्षांपासून घरातून काम केल्याने सर्वांनी मोकळा श्वास घेतला. पुन्हा शरीराला व्यायामाची सवय व्हावी यासाठी आयटी कंपनी कामगारांसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हे सामने दिवस रात्र खेळविल्या गेले असून सर्व फुटबॉल खेळ हा इनडोर ग्राउंडवर झाला आहे. यात मुलींनी मोठा  सहभाग घेतला आहे. मुलांसोबत मुलींही मागे नाही हे यावरून सिद्ध होते.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.