Hockey Competition: व्हिबीएसपी, बेंगलोर सिटी विद्यापीठ संघांची विजयी घौडदौड सुरू  

एसएनबीपी २८वी नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा : पहिल्या दिवशी नोंदविले गेले १३ गोल  

 एमपीसी न्यूज: असोसिएशन  ऑफ  इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या मान्यतेने व एसएनबीपी पुरस्कृत २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत व्हिबीएसपी विद्यापीठ, जौनपूर आणि बेंगलोर सिटी विद्यापीठ, बेंगलुरू  संघांनी अनुक्रमे गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर व कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाचा पराभव करून आपली विजयी घौडदौड सुरू केली. पहिल्या दिवशी झालेल्या दोन लढतींमध्ये एकूण १३ गोल नोंदविले गेले. या स्पर्धेसाठी एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युट  मुख्य प्रायोजक  आहेत.  
एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्यावतीने पिंपरी येथिल मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास स्टेडियमच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील पूल अ मधील उद्घाटनाच्या लढतीत गत स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केल्या व्हिबीएसपी विद्यापीठ संघाने सुरूवातीपासून नियोजनबध्द खेळ करून वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. व्हिबीएसपी संघाला ८ व्या मिनिटाला मिळालेल पहिल्या पेनल्ट कॉर्नरवर विजेंद्र सिंगने आपल्या संघाचा पहिला गोल केला.

त्यानंतर १८ मिनिटाला गुरू नानक देव विद्यापीठ संघाच्या रंजोत संजय, रमणदिप सिंग या खेळाडूंकडून त्यांच्याच डी मध्ये झालेल्या नियमबह्यय खेळामुळे व्हिबीएसपी संघाचा पेनेल्ट स्ट्रोक मिळाला. यावेळी व्हिबीएसपी संघाच्या अंकुर तलवारने दुसरा गोल केले. ३४ व्या मिनिटाला व्हिबीएसपी संघाला मिळालेल्या दुसºया पेनेल्टी कॉर्नरवर त्यांच्या मनिष सहानीने संघाचा  तिसरा गोल केला.

४७ व्या मिनिटाला व्हिबीएसपीच्या अरूण सहानीला धमेंद्र यादवकडून मिळालेल्या पासला योग्य दिशा देत संघाचा चौथा गोल नोंदविला. त्यांनतर धमेंद्र यादव व गगन राजभरने अनुक्रमे ५५ व ५८ व्या मिनिटाला प्रत्येकी एक फिल्ड गोल केला. गुरू नानक देव विद्यापीठ संघाला मिळलेल्या तीन पेनेल्ट कॉर्नरचे रूपांतर त्यांच्या सुदर्शन सिंग, निशान सिंग व अमन गुलाटी यांना गोलमध्ये करता आले नाही. व्हिबीएसपीचा  गालेरक्षक प्रतिक निगमने तिन्ही वेळेस उत्कृष्ट गोलरक्षण करून  गुरू नानक देव विद्यापीठ संघाचे प्रयत्न अयशस्वी केले.

पूल ब च्या सामन्यात  दुसºया बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाकडून २५ व्या मिनिटाला वायएम प्रणाम गौडाने संघाचा पहिला गोल केला. दुसरा गोल ३० व्या मिनिटाला एचएस हर्ष मुटागरने दसरा गाल केला. बेंगलोरच्या एनआर आषिकने आपल्या संगाचा तिसरा गोल करून मजबूत आघाडी दिली.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कुरूक्षेत्र विद्यापीठच्या राहूल कुमारला ३४ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेत आपल्या संघाचा  एकमेव गोल केला. त्यांनतर ४९ व्या मिनिटाला बेंगलोर विद्यापीठ संघाच्या एफएम प्रणवने संघाचा चौथा गोल केला. त्यानंतर बेंगलोरच्या आर. पुनिथने ५६ व्या मिनिटाला व एचएस हर्ष मुटागरने ५८ व्या मिनिटाला गोल करून

आपल्या संघाला मजबूत आघाडी दिली. ही आघाडी बेंगलुरू संघाने शेवट पर्यंत राखली.

तत्पूर्वी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी १६ संघांच्या खेळाडूंनीं  संचालन केले, यावेळी एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले व सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी खेळाडूंकडून मानवंदना स्विकारली. खेळाडूंच्यावतीने एमजीके विद्यापीठ वाराणसी संघाचा खेळाडू अमितने शपथ घेतली. डॉ. भोसले यांनी या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला रोख २५ हजार रूपयांचे पारितोषिक जाहिर केले. यावेळी जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा (जेएनएचटी) सोसायटीचे महासचिव कुकु वालिया, खजिनदार आय. डी. कपूर, एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्या संचालिका अ‍ॅड. ऋतूजा भोसले,  सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिपक माने, सहभागी संघांचे संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक, एसएनबीपीचे क्रीडा संचालक फिरोज शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.