Maval Crime News : जमीन खरेदी करणा-यास जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – जमीन खरेदी आणि विक्री करणा-यांना दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याबाबत अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे आला आहे. मावळ तालुक्यातील कोंडीवडे येथील हे प्रकरण आहे. रवींद्र काळोखे यांनी ही तक्रार केली आहे.

रवींद्र काळोखे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना याप्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, बाळू किसन लामगण यांची कोंडीवडे गावातील जमीन काळोखे यांना विकायची असल्याने त्याबाबत त्यांनी काळोखे यांच्याशी संपर्क केला. काळोखे यांनी जमीन खरेदीसाठी होकार दिल्यानंतर जमीन प्रत्यक्ष बघून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर व्यवहार करण्याचे त्यांच्यात ठरले.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यात एक धक्कादायक बाब काळोखे यांच्या निदर्शनास आली. बाळू लामगण यांचे काका किसन रामजी अडिवळे आणि त्यांचा जावई पप्पू नथू आंद्रे यांनी 19 जुलै 2014 रोजी खोटी माहिती सांगून बाळू लामगण यांच्या वडिलांची कागदपत्रांवर सही घेतली. त्याआधारे ती जमीन स्वतःच्या नावावर बनवून घेतली. याबाबत पप्पू आंद्रे आणि किसन अडिवळे यांनी मान्य केले आहे.

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पप्पू आंद्रे आणि किसन अडिवळे यांनी 24 ऑगस्ट 2015 रोजी नवीन खरेदीखत करून ती जमीन प्रेमनाथ जवारे, सलील पाटील, सुदाम हुशार, विलास सोनवणे, राजेंद्र सूर्यवंशी, किसन साबळे, चंद्रप्रकाश शर्मा यांना विकली. काळोखे हे ती जमीन विकत घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर आंद्रे आणि अडिवळे यांनी काळोखे आणि बाळू लामगण यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आंद्रे याच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु आहे. तर किसन अडिवळे हे शासकीय नोकर असून देखील त्यांनी असा प्रकार केला असल्याचे काळोखे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.