Kokan-Khed : कोकण-खेड तालुका कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज : कोकण-खेड तालुका (Kokan-Khed) अठरागाव रहिवासी विकास संस्था आयोजित तसेच खेड, दापोली, मंडणगड भागातील पिंपरी, चिंचवड व पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या समाज बांधवांचा 22 वा कौटुंबिक स्नेह मेळावा (दि. 25 ऑगस्ट) आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदार संघातील कार्यक्षम आमदार योगेश रामदास कदम, श्रेयाताई योगेश कदम व कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरवात करून समाज बांधवांतील काही मयत बंधू भगिनिंना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर माजी सैनिकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यास महिलांकडून उस्फूर्त प्रतिसाद दिला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यातील त्यांच्या वाटचाली बद्दल तज्ञांचे मार्गदर्शन करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Pimpri Crime : गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड परिसरात तीन ठिकाणी चोरीला गेले मोबाईल

यावेळी रत्नागिरी जिल्हा (Kokan-Khed) परिषदेचे सभापती अरूण (आण्णा) कदम, दापोली नगरपरिषदेचे सभापती भगवानराव घाडगे, नगरसेवक सदगुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, नगरसेविका निर्मला कदम, विजया सुतार, संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम, महिला अध्यक्षा वैजयंती कदम, कॅप्टन श्रीपत कदम, कॅप्टन संजय कदम, राजेश दळवी, अवधूत कदम, मनोहर यादव, एकनाथ कदम, सुनिल साळुंखे, राजेंद्र सोंडकर, ज्ञानदेव पवार, प्रदीप सकपाळ, विजय निकम, अरुण महाडिक, दत्ता महाडिक, जान्हवी कदम, शीतल मोर, राम उत्तेकर आदी मान्यवर, कुंभार समाज, धनगर समाज, पंधरा गाव संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अनंत कदम, मारुती यादव तर संस्थेचे खजिनदार पांडुरंग कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शेवटी सर्व समाज बांधवांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.