Kondhwa: कोंढवा येथे इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज –  कोंढवा येथील महमदवाडी परिसरात एका(Kondhwa) इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग आज (मंगळवार) दुपारी 12 च्या सुमारास लागली.
घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी (Kondhwa)दाखल झाली आहेत.

आग मोठी असून धुर मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि गच्चीवर रहिवाशी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी शिदीचे वाहन व बी ए सेट व्हॅन देखील रवाना केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.