Ravet : क्रिएटीव्ह पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चाैकशीसाठी समिती

एमपीसी न्यूज – क्रिएटीव्ह अकॅडमी साेसायटीच्या क्रिएटीव्ह पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ( Ravet) संचालकाला बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी पाेलिसांनी अटक केल्यानंतर ही शाळा चर्चेत आली आहे. असे असतानाच आता या शाळेकडे  शिक्षण विभागाचे साे मान्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण नाही, वसतीगृह बेकायदेशीर असल्याचे समाेर आल्याने या शाळेच्या चाैकशीसाठी महापालिका शिक्षण विभागाने चार पर्यवेक्षकांची समिती नेमल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

Pimpri : नौशाद शेख याला मागील वेळी राजकीय मदत मिळाली

क्रिएटीव्ह पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलचा नाैशाद शेख हा संचालक आहे. शेख याने वसतीगृहातील दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी शेखला अटक केली. या प्रकरणानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेत जावून पंचनामा केला. शाळेमध्ये निवासी वसतीगृहाची मान्यता नसताना ते बेकायदेशीरपणे चालवणे, शिक्षण विभागाचे साे मान्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण नाही, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसल्याचे समाेर आले. त्यामुळे शिक्षण विभागाने चाैकशी समिती नेमली आहे.

शाळेत घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना दहावी व बारावीच्या परिक्षेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. ज्या मुलांना आपल्या पाल्यांकडे जायचे आहे, त्यांना जावू द्यावे. तसेच मुलींची परिक्षा हाेऊ पर्यंत त्यांच्या आईंनी वसतीगृहात राहण्याची परवानगी मागितली आहे. त्यांना परवानगी देण्याची सूचना संबंधित शाळेला केली ( Ravet) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.