Pune : …आर्थिक सुधारणा व समाजहित साधणारा आशादायी अर्थसंकल्प –  कृष्णा मिश्रा

एमपीसी न्यूज – यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, कर रचनेतील बदल, टॅक्स पेअर चार्टर, ऑनलाईन कर भरणा, महसूल गळती थांबवण्यासाठी केलेल्या तरतुदी, परताव्या संदर्भातील तरतुदी यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व उद्योग जगताला नवं संजीवनी मिळेल असे मत केंद्रीय मुख्य कर आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी पुणे येथील ‘केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण’ या कार्यक्रमात केले.

केंद्रीय मुख्य कर आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण पुणे येथील आयोजित एका कार्यक्रमात केले. दरम्यान हा अर्थसंकल्प आर्थिक सुधारणा व समाजहित साधणारा असा आशादायी अर्थसंकल्प असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मिश्रा म्हणाल्या यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, कर रचनेतील बदल, टॅक्सपेअर चार्टर, ऑनलाईन कर भरणा, महसूल गळती थांबवण्यासाठी केलेल्या तरतुदी, परताव्या संदर्भातील तरतुदी यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

तसेच स्थानिक उद्योग आणि उत्पादकांनाही दिलासा मिळेल. वस्तू व सेवा कर प्रणाली सुकर करण्यासाठी पावले उचलली आहेत. महसुलात गैरप्रकार होऊ नयेत, याकरिता विक्रेत्यांना देयके देणे बंधनकारक केले आहे. ‘फ्री ट्रेड अग्रीमेंट’, ‘अँटी डंपिंग ड्युटी सारखे चांगले निर्णय घेण्यात आले आहेत.प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांमध्ये करदात्याच्या दृष्टीने चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. येत्या काळात ऑनलाईन प्रक्रियेमुळे करभरणा, परतावा अधिक सुलभ होईल.  स्थानिक उद्योगांचे सक्षमीकरण व मेक इंडियाला यामुळे बळ मिळेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभागाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण या कार्यक्रमाप्रसंगी सीए डॉ. गिरीश अहुजा, राज्य कर उपायुक्त संजाली दियास, सीए विक्रम मेहता, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘आयसीएआय’च्या पुणे विभागाच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.