Pune : इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत कुमकुम लुंकड हिचे यश 

एमपीसी न्यूज – अभ्यासाव्यतिरिक्त इंग्लिश विषयात विद्यार्थ्यांनी सखोल ज्ञान अभ्यासावे या उद्देशाने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत कुमकुम संतोषकुमार लुंकड हिने राज्यातून 27 वा क्रमांक मिळविला. 

या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातून एक हजार विद्यार्थी, विद्यार्थीनी बसले होते. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. नाशिक, सेंट फ्रान्सिस हायस्कूल या शाळेतील कुमकुम संतोषकुमार लुंकड हिने राज्यातून २७ वा क्रमांक मिळविला. तर, शाळेतून तिने तिसरा क्रमांक पटकाविला.

या यशाबद्दल कुमकुम लूंकडला शाळेत प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी या यशाबद्दल तिचे कौतूक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.