Talegaon : रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटीचे मावळते अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटीचे मावळते अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील यांचा रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट 3131 कडून विशेष सन्मान करण्यात आला. युथ डायरेक्टर रो. पुष्पराज मुळे यांच्या हस्ते मोहोळ यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांच्या सह माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरी युथ डायरेक्टर पुष्पराज मुळे, डिस्ट्रिक्ट रोट्रॅक्ट प्रतिनिधी ध्रुव गुजराथी, डिस्ट्रिक्ट रोट्रॅक्ट प्रतिनिधी इलेक्ट अक्षय मोरे, पार्थ जावकर, रिषभ कारवा, शुभम मालपाणी, जोगप्रभा पांडा आदी उपस्थित होते.

डॉक्टर्स डे, पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना  रेनकोट वाटप, अंध अपंग व्यक्तींना अन्न धान्य वाटप,  विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, इंद्रायणी मॅरेथॉन, शिक्षक दिन, गणेश विसर्जन वेळी पर्यावरणपूरक मूर्तीदान प्रकल्प, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, सायकल प्रकल्प, रक्तदान शिबिर,  किल्ले बनवणे स्पर्धा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कापडी पिशव्यांचे मोफत वाटप आदी क्लबने राबविलेल्या समाजोपयोगी प्रकल्पांची दखल घेत केशव मोहळ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.