Pimpri : विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा उद्यापासून बेमुदत राज्यव्यापी संप

पिंपरी येथील मेळाव्यात निर्णय : 9 जुलैपासून पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह रिक्षाचालकांचा राज्यव्यापी संप

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी उद्यापासून (९ जुलैपासून) बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. याबाबतचा निर्णय पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आयोजित रिक्षाचालकांचा मेळाव्यात घेतला आहे. या आंदोलनास कष्टकरी कामगार पंचायत वतीने प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, संभाजी गोरे यांनी पाठिंबा दिला. दि. 9 जुलै रोजीचा बंद हा महाराष्ट्रभर असून व्यापार देखील बंद असणार आहे.

हा संप सरकारने लादला असून संप अटळ आहे, आत्ता माघार घेणार नाही. सरकारला रिक्षाचालकांची ताकत दाखवून देऊ असा इशारा कृति समिती महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कामगार नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे . दि. 9 जुलैपासून पिंपरी चिंचवडसह पुण्यात रिक्षा बेमुदत राज्यव्यापी संप होणारच असा निर्णय पिंपरी येथील मेळाव्यात घेण्यात आला.

  • रिक्षाचा मुक्त परवाना बंद करण्यात यावे, परिवहन विभागाच्या अंतर्गत रिक्षाचालक मालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची अमलबजावणी करण्यात यावी. इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत. ओला-उबेरसह बेकायदेशीर वाहतुक बंद करण्यात यावी. यांसह इतर विविध मागण्याबाबत महाराष्ट्र सरकारने 30 जूनपर्यंत रिक्षा संघटना प्रतिनिधी सोबत चर्चा करावी. दि. 9 जुलैपासून महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षाचालक-मालक बेमुदत संपावर जातील, अशी घोषणा 9 जून रोजी मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आली होती.

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांना देण्यात आले आहे. परंतु सरकारच्या वतीने 30 जूनपर्यंत चर्चा न केल्यामुळे आणि रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडविल्यामुळे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरातील दीड लाखपेक्षा अधिक रिक्षाचालकांसह महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षाचालक-मालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

मेळाव्यात संप करण्याचा निर्णय घेत यातून सरकारला रिक्षाचालकांची ताकत दाखवून देऊ, असा इशारा कृति समिती (महाराष्ट्र)चे सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कामगार नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.

  • मी महाराष्ट्रातील मराठवाडा ,कोकण, विदर्भाचा दौरा करुन रिक्षाचालकांमध्ये जनजागृती केली असून रिक्षाचालकांचे प्रश्न न सुटल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी असल्याचे यावेळी जाणवले. रिक्षाचालकांनी त्यांच्या मत व्यक्त केले असून मुंबई, नवी मुंबई नागपूर , सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद , नांदेड, लातूर ,जालना, बीड, चंद्रपूर, अकोला, भंडारा-गोंदिया सह महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षाचालक-मालक या संपात सहभागी होणार आहेत. ज्या संघटनांनी संपला विरोध केला आहे, त्यांनी रिक्षाचालकांसाठी काहीच केले नाही. रिक्षाचालक संपात सहभागी होऊन त्यांना उत्तर देतील, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.

यावेळी शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, दिलीप साळवे, जेकब मेत्याव, नाना गाडे, वकिल शेख, अजित बराटे, सचिन मेत्रे, अंथॉनी पंडित , कैलास वालांडे, बाळासाहेब सूर्यवंशी, एकबल शेख ,नारायण लोखंडे, इजाज शेख, परवेज पठाण , शाम विटकर,दिनेश चिंचवडे, संदीप लोंढे आदी उपस्थित होते .

  • ह्या आहेत ऑटोरीक्षा चालकांच्या मागण्यां
    1) मुक्त ऑटोरीक्षा परवाने त्वरित बंद करण्यात यावे.
    2) ऑटोरीक्षा चालक कल्याणकारी महामंडलाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी.
    3) वाढलेले इंश्योरेंस दर कमी करण्यात यावे.
    4) ओला उबेर अप्स कंपन्या बंद करण्यात यावे.
    5) अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली पाहीजे.
    6) ऑटोरीक्षा चालकाला पब्लिक सर्वेन्ट चा दर्जा मिळावा.
    7) आर.टी.ए. कमिटीवर ऑटोरिक्षा चालकांच्या एक प्रतिनिधी नेमन्यात यावा. यांसह इतर विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.