Pimpri : चोरट्यांनी बॅग, मोबाईल, सोन्याचा बदाम हिसकावला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. ठिकठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. शनिवारी (दि. 6) आणि रविवारी (दि. 7) आळंदी, हिंजवडी, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी बॅग, मोबाईल आणि सोन्याचा बदाम असा एकूण 32 हजार 550 रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

आळंदी पोलीस ठाण्यात उषा अनिल कड (वय 36, रा. केळगाव, ता. खेड) यांनी बॅग चोरीची तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 7) चाकण चौकातील नेहा टेलरिंग दुकानासमोरून उषा यांची बॅग चोरट्याने चोरून नेली त्यामध्ये एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज होता. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

  • गणेश बाळासाहेब मस्कर (वय 18, रा. थेरगाव) हे शनिवारी रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी रिक्षातून दोनजण आले. त्यातील मागे बसलेल्या इसमाने गणेश यांच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 550 रुपये चोरून नेले. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गणेश यांनी फिर्याद दिली.

तर, दिव्या रंजन मोहंती (वय 34, रा. त्रिवेणीनगर, पुणे) त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत कृष्णानगर भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करत होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचा तीन ग्रॅम वजनाचा 9 हजार किमतीचा बदाम हिसकावून नेला. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.