Pimpri News: लालबाबू गुप्ता यांनी सामाजिक कार्यात उमटविला ठसा नि:स्वार्थी समाजसेवा आणि मानवतेने भूतलावर सुवर्ण भारत घडवणार – डॉ लालबाबू गुप्ता

एमपीसी न्यूज: विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांना सामाजिक कार्यात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. लालबाबू गुप्ता यांनी गेल्या अनेक वर्षांत सामाजिक बांधिलकी जोपासली. एव्हढेच काय तर त्यांनी आपल्या परोपकारी कार्यांद्वारे देशभरात अनोखा ठसा उमटविला आहे. लालबाबू यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत या उच्च सन्मानाने नुकतेच त्यांना गौरविण्यात आले. सामाजिक कार्यातील डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. नवी दिल्ली येथे झालेल्या एका सर्वसाधारण परिषदेत त्यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ द किंगडम ऑफ टोंगाकडून ही पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दिल्लीत झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठातर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

लालबाबू गुप्ता गेल्या अनेक वर्षांपासून विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्यांच्या संस्थेने अनेक मुलींचे लग्न लावून दिले, तसेच समाजातील गोरगरीबांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील अनेक राज्यांत त्यांचे हे कार्य निस्वार्थीपणे सुरू आहे. शिक्षण, पर्यावरण संरक्षण, उपजीविका, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालविकास, ग्रामीण रोजगार, शेतकरी कल्याण, शेतकरी कल्याण, निष्पक्ष पत्रकारिता, संस्कृती संवर्धन-सुशासन अशा विविध क्षेत्रात लालबाबू सध्या कार्यरत आहेत.

राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र विकास आमचे ध्येय – डॉ. लालबाबू गुप्ता
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.लालबाबू गुप्ता म्हणाले की, देशाच्या विविध भागांच्या दौर्‍यादरम्यान गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी खूप काही करण्याची गरज असल्याचे आम्हाला प्रकर्षाणे जाणवले. ग्रामीण भागातील गरिबांचे जीवनमान सुधारून त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्याची गरज आहे.
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला तरच सामाजिक विकास शक्य आहे. म्हणूनच आम्ही आणि आमची टीम सतत या कामात गुंतलेलो आहोत. या कार्यामुळे आज मला डॉक्टरेट मिळणे हा माझा बहुमान समजतो. या पुरस्कारामुळे माझ्या कामाबद्दलचा उत्साह वाढला आहे. माझ्यात एक कमालीची ऊर्जा साकारली आहे. सामाजिक कार्याची जबाबदारी वाढेल. राष्ट्रीय एकता आणि राष्ट्र विकास हेच आमचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील गरिबांचा विकास आणि उन्नती हे आमचे स्वप्न आहे.

डॉ. लालबाबू गुप्ता यांच्या सामाजिक कार्याची उत्तुंग झेप…

1) डॉ लालबाबू गुप्ता हे विश्व श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ही संस्था महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीसह 18 राज्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे.
2) शनिवार दिनांक 18 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ किंगडम ऑफ तोंगाद्वारे डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्रदान
3) डॉ. लालबाबू गुप्ता हे पुण्यातून प्रकाशित होणार्‍या हिंदी साप्ताहिक व्हीएसआरएस या वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, पाटणा, अयोध्या, गोपाळगंज यांसह अनेक महानगरांमध्ये या वृत्तपत्रासाठी टीम कार्यरत आहेत. वृत्तपत्राची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित होते. निर्भय व निष्पक्ष पत्रकारितेचे मूल्य जोपासत हे साप्ताहिक वृत्तपत्र गेल्या 4 वर्षांपासून प्रकाशित होत आहे.
4) डॉ. लालबाबू गुप्ता हे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातून एलएलबी पदवी घेत आहेत.
5) सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे अध्यक्ष आहेत.
6) श्री राम गुरुकुलाचे संस्थापक आहेत.
7) श्रीराज या गुरुकुलचे कार्यकारी संचालक आहेत.
8) श्रीराज प्रॉडक्शन हाऊसचे निर्माते
9) अध्यक्ष-श्रीराम महिला बाल सक्षमीकरण
10) ऑक्टानार्टिक्स फार्मास्युटिकल्स चे महाव्यवस्थापक आहेत.
11) खेती ऍग्रो स्वयंसिद्ध या कंपनीचे संचालक
12) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
13) उत्तर भारतीय समाजाचे आधारस्तंभ आहेत. लालबाबूजी धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सदैव व्यस्त असतात.
14) पिंपरी-चिंचवड शहरातील कुशल उद्योगपती आहेत.
15) महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आहे आणि बिहार ही त्यांची जन्मभूमी आहे.
16) भारत दर्शन राष्ट्रीय महोत्सवातर्फे 2019 मध्ये समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
17) पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील भारतीय ज्ञानवर्धिनी सभा (हिंदी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय) तर्फे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
18) बिहार फाउंडेशनतर्फे प्राइड ऑफ बिहार पुरस्काराने सन्मानित
19) वाल्मिकी समाज संस्थेतर्फे राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान
20) सनातन सेवा प्रतिष्ठानचा समाजसेवा पुरस्काराने सन्मान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.