Pune News : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे सर्वेसर्वा जगन्नाथ शेट्टी यांचं निधन

एमपीसी न्यूज – पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे सर्वेसर्वा जगन्नाथ शेट्टी (89) यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. मागील काही दिवसांपासून जगन्नाथ शेट्टी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

जगन्नाथ शेट्टी मुळचे कर्नाटक राज्यातील होते, वयाच्या 17 व्या वर्षी ते पुण्यात आले. 1951 मध्ये त्यांनी ‘कॅफे मद्रास’ हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम व वैशाली हॉटेल सुरू केले. सुरुवातीला वैशाली हे अगदी छोटे रेस्टॉरंट होते, पण मेहनत आणि दर्जेदार सेवेच्या जोरावर त्यांनी ‘वैशाली’चं नाव पुणेकराच्या मनामनात पोहोचवले. हॉटेल वैशालीला पुणे महापालिकेकडून ‘क्लिनेस्ट किचन’ पुरस्कार देखील मिळाला आहे.

जगन्नाथ शेट्टी यांचा त्रिदल संस्थेने प्रतिष्ठित ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांच्या निधनामुळं एक यशस्वी व सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.