Pune Crime News : कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, 443 गुन्हेगार अटकेत

एमपीसीन्यूज : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात काेबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान हे काेबिंग ऑपरेशन करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी दाेन हजार 893 गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी 756 गुन्हेगार मिळून आले.

या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या 414 केसेस करुन 443 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 16 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या काेबिंग ऑपरेशनमध्ये 176 जणांना सीआरपीसी कलम 149 नुसार नाेटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आर्म अॅक्टनुसार एकूण आठ गुन्हे दाखल करुन आठ आराेपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून सात पिस्टल, एक गावठी कट्टा व नऊ काडतुसे असा दाेन लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याचप्रमाणे घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करुन त्यात 66 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 48 काेयते, 14 तलवारी, एक कुकरी, पाच पालघन, एक चाकु, दाेन सत्तुर, दाेन लाकडी साेटे असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.