LokSabha Elections 2024 : ‘विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानासाठी आग्रह करावा’

एमपीसी न्यूज – मुलांची प्रत्येक मागणी पालक  (LokSabha Elections 2024) पूर्ण करत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मे महिन्यात होणाऱ्या मतदान प्रकियेत सहभागी होऊन मतदान करण्याचा हट्ट केल्यास मतदानाची टक्केवारी वाढून, लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असे मत उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी व्यक्त केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कुल निगडी येथे भोसरी विधानसभा विशेष मतदार जनजागृती शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या शारदा साबळे, निवडणूक अधिकारी अमोल फुंदे, संजय धोत्रे, विनायक भुजबळ, राजीव कुटे, शिवाजी अंबिके, जयश्री चव्हाण, मनीषा बोत्रे, कविता गायकवाड उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी लबडे म्हणाले, मतदानाच्या दिवशी बरेच पालक मुलांसोबत बाहेर फिरायला जातात. त्यामुळे शहरी भागातील मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानास जाण्यास सांगून मतदान केल्यानंतर पालकांसोबत सेल्फी काढून तो शिक्षकांना पाठवावा.

Pune : बिबट्या शिरला चक्क हॉस्पिटलमध्ये; वनरक्षकावर केला हल्ला तर बिबट्याला पकडण्यासाठी मोठी कसरत

शिक्षकांनीही अशा मुलांची लोकशाही टिकविण्यात विशेष सहभाग म्हणून नोंद घ्यावी असे मार्गदर्शन केले. तसेच 18 वर्ष पूर्ण झाल्यास मतदार यादीत आपले नाव नोंदवून जागरूक मतदार व्हावे असे सांगितले.

यावेळी विनायक भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (LokSabha Elections 2024) शिवाजी अंबिके यांनी तर आभार मनीषा बोत्रे यांनी मानले. उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.