LokSabha Elections 2024 : महायुतीची फौज उतरणार प्रचारात, 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची(LokSabha Elections 2024) पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारक म्हणजे काय?

ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना(LokSabha Elections 2024) स्टार प्रचारक म्हटले जाते. या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो. त्यामुळे निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना वाटते आपल्या प्रचाराला स्टार प्रचारकाने यावे.

 

Pune : बिबट्या शिरला चक्क हॉस्पिटलमध्ये; वनरक्षकावर केला हल्ला तर बिबट्याला पकडण्यासाठी मोठी कसरत

 

त्यांच्या रॅली, सभांवर मोठा खर्च होतो. स्टार प्रचारकाला वेळेअभावी अनेक ठिकाणी सभेला जाण्यास विमान, हेलिकॉप्टरसह अन्य गोष्टी लागतात. त्यामुळे स्टार प्रचारकाचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही. हा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो.

हे आहेत स्टार प्रचारक?

नरेंद्र मोदी
जगतप्रकाश नड्डा
राजनाथ सिंह
अमित शाह
नितीन गडकरी
योगी आदित्यनाथ
प्रमोद सावंत
भूपेंद्रभाई पटेल
विष्णूदेव साय
मोहन यादव
भजनलाल शर्मा
एकनाथ शिंदे
अजित पवार
रामदास आठवले
नारायण राणे
अनुराग ठाकूर
ज्योतिरादित्य शिंदे
स्मृती इराणी
रावसाहेब दानवे पाटील
शिवराज सिंह चौहान
देवेंद्र फडणवीस
सम्राट चौधरी
अशोक चव्हाण
विनोद तावडे
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
पीयूष गोयल
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
के. अण्णामलई
मनोज तिवारी
रवी किशन
अमर साबळे
विजयकुमार गावित
अतुल सावे
धनंजय महाडिक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.