BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पवन मावळातील पवना धरणात बुडून आज एका युवकाचा मृत्यू झाला. मागील दहा दिवसात या धरणात तिन युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

अतुल अनिलकुमार गगन (वय 23, रा. पटना, सध्या राहणार इन्फोसिस हिंजवडी) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

  • हिंजवडी आयटी पार्क येथील पाचजण आज दुपारी पवना धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता पाण्यात बुडून अतुलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रची रेस्कू टिम घटनास्थळी दाखल झाली.

शिवदुर्गचे महेश मसणे, सागर कुंभार, राहुल देशमुख, मोरेश्वर मांडेकर, स्वप्निल भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, गणेश गायकवाड, योगेश उंबरे,राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. 9 एप्रिल रोजी देखिल याच धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

HB_POST_END_FTR-A4

.