Lonavala : खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघातात मंत्री हसन मुश्रीफ यांचे सचिव जखमी!

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिटजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मंत्री हसन मुश्रीफ यांचे सचिव रणबीर चव्हाण व त्यांच्याशी संबंधित अन्य एक व्यक्ती व चालक असे तीनजण जखमी झाले आहेत.

रणबीर चव्हाण हे कोल्हापूर जिल्हा बॅकेतील हसन मुश्रीफ यांचे सचिव असून अन्य एक जण देखिल जिल्हा बॅकेचे अधिकारी आहेत. त्यांना तातडीने पनवेल येथिल एमजीएम रुग्णालयात उपचाराकरिता हालविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण व अन्य एक जण इर्टिका कार (एमएच 09 डीएम 1690) मधून मुंबईच्या दिशेने जात असताना खोपोली एक्झिटजवळ मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक (टीएन 52 एम 2577) ची कारला मागून जोरात धडक बसल्याने कारचा अक्षरशः चेदामेंदा झाला. सुदैवाने सर्वजण बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर ट्रकमधील पेपर काॅईल रस्त्यावर तसेच दरीत पसरल्याने काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.