Lonavala News : थर्टी फस्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांच्या हाॅटेल व्यावसायिकांना सुरक्षेबाबत सूचना

एमपीसी न्यूज : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहरात येणार्‍या पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांची करडी नजर असणार आहे. (Lonavala News) तसेच हाॅटेल व्यावसायिकांनी सुरक्षेबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारी लोणावळा परिसरातील हाॅटेल व्यावसायिकांची बैठक घेत पोलीस प्रशासनाकडून IPS सत्यसाई कार्तिक व शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी सूचना दिल्या. 

ख्रिसमस व नवीन वर्षाचा स्वागत समारंभ लोणावळ्यात फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर दिवशी लोणावळा शहरामध्ये फार मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. ते आपले खाजगी बंगले, हाॅटेल्स व फार्महाऊस इत्यादी ठिकाणी राहतात. (Lonavala News) सध्या दहशतवादी कृत्य घडण्याची शक्यतेच्या अनुषंगाने काही अनुचित प्रकारच्या घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये यासाठी आपले हॉटेल/बंगले / फार्महाउस इ. ठिकाणी येणार्या लोकाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने आपणाकडुन सर्व प्रकारची दक्षता घेवुन खालीलप्रमाणे उपाय योजना कराव्यात असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

1) आपल्या हॉटेलमध्ये येणारे सर्व पर्यटकांची हॉटेल मध्ये प्रवेश करताना तपासणी करण्यात यावी त्या करीता प्रवेशव्दारावर खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणुक करावी तसेच महीलांचे सुरक्षीततेच्या दृष्टीने महीला सुरक्षा रक्षकाची नेमणुक करण्यात यावी तसेच घातपात विरोधी तपासणी करण्यासाठी डी. एफ. एम. डी. ची व्यवस्था करून त्याद्वारे तपासणी करावी.

2) हॉटेल मध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासूनच हॉटेल मध्ये प्रवेश देण्यात यावा तसेच ग्रुपने येत असलेल्या पर्यटकांची प्रत्येकाची तपासणी करून त्यांचे ओळख पत्राची एक छायांकित प्रत घेण्यात यावी.

3) हॉटेलच्या प्रवेशव्दारावर मेटल डिटेक्टरची व्यवस्था करावी.

4) नववर्ष स्वागत कार्यक्रमाच्या ठिकाणी काही अप्रीय घटना घडल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिका/डॉक्टर/मेडीसीनची व्यवस्था ठेवावी.

5) कार्यक्रमाचे ठिकाणी व परीसरात आढळुन येणार्या बेवारस वस्तू तसेच कोणी संशयीत इसम आढळुन आल्यास त्या बाबत तात्काळ पोलीस स्टेशन येथे माहीती कळवावी.

6) कार्यक्रमाचे ठिकाणी गर्दी होण्याचा संभव असल्याने तेथे गर्दी मुळे चेंगराचेंगरी सारखे प्रकार टाळण्याकरीता योग्य त्या उपाययोजना करून आपल्याकडील स्टाफद्वारे देखरेख ठेवण्यात यावी.

7) कार्यक्रमाचे ठिकाणी ईमरजन्सी एक्झिट ची व्यवस्था करण्यात यावी जेणे करून काही अनुचित प्रकार घडल्यास नागरीकांना तात्काळ बाहेर पडता / काढता येईल व त्याबाबत पर्यटकांना माहित दयावी.

8) कार्यक्रम ठिकाणी करण्यात येणारी विद्युत रोषणाई अधिकृत ठिकाणावरून वीज कनेक्शन घेउन एम. एस. ई. बी. कार्यालय यांच्या कडून तपासणी करून घेउन शॉर्ट सर्किटसारखे प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

9) कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी येणारे पर्यटकांची वाहने पार्कींग करण्यासाठी पार्कींगची व्यवस्था करावी. वाहने आपल्या हॉटेलचे समोर उभी राहून त्यामुळे गर्दी होउन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पार्कीगच्या प्रवेश द्वारावर सर्व वाहनांचे नंबर येतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. पार्किंग होणारे प्रत्येक वाहनाच्या चालकाचे नाव व पत्ता तसेच लायसन्स नंबर एक रजिस्टर करून त्यामध्ये नोंदवून ठेवावेत तसेच वाहनाच्या तळभागाची तपासणी करण्याचा आरसा ठेवावा.

10) आपण आपल्या हॉटेल मधील सर्व स्टाफची बैठक घेउन त्यांना घातपाती कृत्य घडण्याच्या शक्यतेच्या अनुषंगाने सूचना देण्यात याव्यात तसेच हॉटेल मधील लॉन, कुंडया, हॉटेलच्या रूम डस्टबीन स्टोअर रूम, गॅप पॅसेज इ. ठिकाणे चेक करून घ्यावीत, हॉटेलमध्ये एखादी संशयित वस्तु आढळल्यास त्वरीत पोलीस स्टेशनला कळवावे.

11) हॉटेल मधील लॉबी, जीने, पार्टीची ठिकाणे, लोकं एकत्र येतील अशा सर्व ठिकाणी तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन हॉटेलचा परीसर कॅमे-यामध्ये कव्हर करण्यात यावा.

12) हॉटेल मध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात त्यामध्ये काही लोक मद्य प्राशन करून हॉटेलमध्ये येणा-या स्त्रिया व मुलींची छेड काढल्याचे प्रकार होउन त्यामुळे वाद निर्माण होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस आपणास जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशा घटना घडणार नाही व त्यास प्रतिबंध करण्यासाठी वेगळा स्टाफ ठेवावा, तसेच दारू पिउन, गैरवर्तन करून इतर लोकांना त्रास होईल असे वर्तन करणा-यांना तात्काळ बाहेर काढण्यात यावे. जेणे करून इतर लोकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.

13) थर्टी फस्ट व नविन वर्षाच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई केली जाते. यामधून अनेकवेळा आग लागण्याच्या घटना घडतात. याकरिता हाॅटेल मधील अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित आहे का याची खात्री करून ती सज्ज ठेवावी. आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.