Lonavala : शहरात पोलिसांचा रुटमार्च; कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अतिमहत्त्वाच्या कामाखेरीज बाहेर पडल्यास पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई मोहिम सुरु केली आहे. तसेच शहरात पोलीसांचा रुटमार्च काढण्यात आला. याचाच एक भाग म्हणून आज लोणावळा शहरात पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सर्व पोलीस दलासह संचलन करत नागरिकांनी घरात थांबण्याचे आवाहन केले.

लोणावळा पोलीस स्टेशन, सिध्दार्थनगर, गावठाण, शेतकरी पुतळा, जयचंद चौक, शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ मार्गे भांगरवाडी ते पुन्हा पोलीस स्टेशन दरम्यान हा रुटमार्च काढण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.