BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : ओळकाईवाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

781
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील ओळकाईवाडी या गावातील एका तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्वेता परशुराम गायकवाड (वय २१) असे युवतीचे नाव आहे. गुरुवारी दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

याबाबत परशुराम धर्मा गायकवाड (वय ५३, रा. ओळकाईवाडी, ता.मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार परशुराम गायकवाड हे सकाळी ९.३० वाजता आपल्या कामाला गेले, तेंव्हा श्वेता ही घरीच हाती. दुपारी अडीच वाजता ते जेवणासाठी घरी आले तेंव्हा त्यांना घराचे दार उघडे असल्याचे आणि घरात कोणीच नसल्याचे दिसले. त्यांनी बेडरूममध्ये बघितले असता त्याठिकाणी श्वेता हिने फॅनला ओढणी बांधून त्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

याबाबत तिने गळफास का घेतला? याचे कारण अद्याप स्पष्ट समजले नसून आपला कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, संतोष शेळके हे करीत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.