Pune : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून (Pune)  एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांच्याही घराला येण्या आणि जाण्यासाठी असलेला लोखंडी जिना काढून त्या जागी सिमेंटचा जिना बांधण्यास विरोध केल्याने या तरुणाला त्रास दिला जात होता. या तणावातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

तरुणाने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मनोज मोहन दाभोळकर (वय 24, रा. आनंद विहार, हिंगणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत त्याचे वडिल मोहन दाभोळकर (वय 50) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक गोपाळ बांडागळे (वय 50) आणि कल्पना अशोक बांडागळे (रा. आनंद विहार, हिंगणे) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 10 एप्रिल रोजी घडला होता. या घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pune : दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी हे शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्या येण्या-जाण्यासाठी सामाईक लोखंडी जिना होता. बांडागळे यांनी तो जिना काढून तेथे सिमेंटचा जिना बांधण्यास सुरुवात केली. त्याला मनोजने  विरोध केला. तेव्हा बांडागळे यांनी आम्ही जिना तर बांधणारच तुला काय करायचे ते कर, असे बोलले. त्याला मानसिक त्रास दिला. या त्रासातून मनोज याने 10 एप्रिल रोजी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात “शेजारचे बांडागळे हे बांधकामामुळे आम्हाला त्रास देत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे”, असे लिहिले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली होती. तपासात हा प्रकार समोर आल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत (Pune) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.