Loni Kalbhor : फरारी गुन्हेगारास लोणी काळभोर पोलीसांनी पकडले

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात लोखंडी कोयता फिरवून आणि फिर्यादीवर हल्ला करुन त्याला मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस पोलीसांनी नुकतीच अटक केली.

Weather Update : राज्यात पाच दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता

याबाबत सविस्तर माहिती अशी – पुणे शहरात १३ जून रोजी कोम्बिंग ऑप्रेशन करण्यात येत होते.त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक महानोर व पोलीस अंमलदार यांना कोम्बिंग ऑप्रेशनच्या अनुशंगाने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत असताना पोलीस अंमलदार राजेश दराडे व बाजीराव वीर यांना त्यांच्या बातमीदाराकडून खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील व पाच महिन्यांपासून फरारी असलेला आरोपी गणेश भोसले पाण्याच्या टाकीमागे विटभट्टीवर माळी मळा (Loni Kalbhor)  येथे आलेला असल्याचे कळले.त्यानंतर पोलीस अंमलदार राजेश दराडे व बाजीराव वीर येथे घटनास्थळी गेले. त्यावेळी गणेश भोसले हा पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करुन पोलीसांनी त्याला पकडले.

 

https://youtu.be/toMk5v4NvvQ

 

 

 

 

त्यावेळी त्याने आपले नाव गणेश बाळू भोसले (Loni Kalbhor)  (वय २१, रा.पाण्याचे टाकीजवळ,माळीमळा., ता.हवेली, जि. पुणे) असे सांगितले.त्याशिवाय आपण केलेल्या गुन्ह्याची कबुलीसुध्दा दिली. आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास उप निरीक्षक मोरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.