Weather Update : राज्यात पाच दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची (Weather Update) शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

Pimpri Youth Congress : पांडुरंगा केंद्र सरकारला महागाई कमी करण्याची सद्बुद्धी दे; युवक काँग्रेसचे साकडे

 

पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर म्हणाले की, पश्चिम किनाऱ्यावर ऑफ द शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे.

 

https://youtu.be/toMk5v4NvvQ

 

 

येत्या पाच दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यासह वादळाची (Weather Update) शक्यता असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याचे होसळीकर यांनी व्टिटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून सोमवारी औरंगाबादमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला.मात्र राज्यातील अनेक भागात अदयापही पावसाची प्रतिक्षा आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगण,पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात सोमवारी पाऊस दाखल झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.