Ajit Pawar in Dehu : अजित पवार यांना भाषण करू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवारी) श्रीक्षेत्र देहू येथे झाले. दरम्यान, या सोहळ्यात उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. त्यामुळे अजित पवार यांना (Ajit Pawar in Dehu) भाषणापासून डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देहूतील कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar in Dehu) यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं मला वाटतं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर, भाजपने याबाबत माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केली आहे.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पंढरपूर देवस्थान समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित आहेत.

PM Narendra Modi : संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे भारताचे आधार केंद्र

सुरुवातीला नितीन महाराज मोरे यांचे प्रस्ताविकपर भाषण झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलले. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होईल असे अपेक्षित होते. ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पण, त्यांच्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू झाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यापासून डावलण्यात आले का, याची चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.