Akurdi : मोबाईल दुकानातून रोख रकमेसह लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास ज्ञानेश्वर कॉलनी, मेन रोड आकुर्डी येथे उघडकीस आली.

ओमप्रकाश लवकुश सोनी (वय 34, रा. सिद्धी रेसिडेन्सी, स्पाईन रोड, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश यांचे आकुर्डी मधील ज्ञानेश्वर कॉलनी मेन रोड येथे जय मोबाईल शॉपी नावाचे मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता ओमप्रकाश यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा मागील दरवाजा कटावणी व स्क्रू ड्रायवरच्या सहाय्याने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि 12 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप असा एकूण 17 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यावरून ओमप्रकाश यांनी तात्काळ निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.