Mahalunge : कामगारानेच पळवला हॉटेल मालकाचा एक लाखांचा ऐवज

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये काम करणाऱ्या (Mahalunge) कामगाराने हॉटेल मालकाची सोन्याची साखळी व मोबाईल, रोख रक्कम असा 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 9 नोव्हेबर रोजी महाळुंगे येथील सदगुरु हॉटेल येथे सकाळी घडला.

याप्रकऱणी महिला हॉटेल व्यावसायिकेने मंगळवारी (दि.13) फिर्याद दिली असून चंद्रभान ब्रजलाल कुशावह (रा. मध्यप्रदेश) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News: रंगला सुमधुर गीतांचा कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे महाळुंगे येथे सदगुरु नावाचे हॉटेल असून आरोपी तेथे कामगर म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादी यांनी कापडी पिशवीत ठेवलेली दिड तोळ्याची सोन्याची साखळी, रोख रक्कम 25 हजार, मोबाईल असा एकूण 1 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज चोरून (Mahalunge) नेला आहे. चाकण पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.