Maharashtra : ज्ञानेश्वरी वाचताना भावाने केला घात; सांगलीत डॉक्टरची हत्या

एमपीसी न्यूज – घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन (Maharashtra) करत असलेल्या डॉक्टर भावाची घरात घुसून फार्मासिस्ट भावाने खुरप्याने वार करत हत्या केली. कौटुंबिक कारणावरून हा प्रकार झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. डॉक्टर भावाची पत्नी आणि मुले घरात असताना त्यांच्यासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

डॉ. अनिल बाबाजी शिंदे (वय 43, रा. कुपवाड, सांगली) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. अनिल यांचा भाऊ संपत बाबाजी शिंदे याला अटक केली आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, डॉ. अनिल आणि त्यांचा भाऊ संपत यांच्यात घरगुती कारणावरून वाद होता. अनिल यांचा कुपवाड येथे दवाखाना होता. ते सध्या भाड्याच्या घरात राहत होते. अनिल हे त्यांच्या घरी सकाळच्या वेळी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करत बसले होते. त्यावेळी त्यांची पत्नी घरातील कामे करीत होत्या. संपत खुरपे घेऊन अनिल यांच्या घरात आला. त्याने अचानक अनिल यांच्यावर पाठीमागून वार केले.

Thergaon : व्हेरॉक अकादमीचा पूना क्लबवर विशाल धावसंख्येने विजय

अनिल हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने त्यांच्या पत्नी घाबरून (Maharashtra) दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पळाल्या. त्यांनी आरडओरडा केला असता आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांनी घरात जाऊन बघितले असता डॉ. अनिल यांचा जागीच मृत्यू झाला होता.

खून केल्यानंतर आरोपी संपत तो राहत असलेल्या भाड्याच्या घरात लपून बसला. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले. कुपवाड एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, निर्घृणपणे झालेल्या या हत्येमुळे कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.