Maharashtra Corona Update : राज्यात आज 17,433 नवे रुग्ण; 13,959 कोरोनामुक्त

आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 496 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 17 हजार 433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 292 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज दिवसभरात 13 हजार 959 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. 

आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 496 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 8 लाख 25 हजार 739 एवढी झाली असून, राज्यभरात सध्या 2 लाख 01 हजार 703 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 25 हजार 195 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 42 लाख 84 हजार नमुन्यांपैकी 8 लाख 25 हजार 739 नमुने पॉझिटिव्ह (19.27 टक्के) आले आहेत. राज्यात 14 लाख 04 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या 36 हजार 785 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 292 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.5 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.