Maharashtra Corona Update: सोमवारी 749 रुग्णांना डिस्चार्ज, 2033 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांवर

Maharashtra Corona Update: 749 patients discharged on Monday, 2033 new patients, number of active patients over 25 thousand

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 35 हजार 58 झाली आहे. आज 2,033 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 749 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 8 हजार 437 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 25 हजार 392 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 82 हजार 194 नमुन्यांपैकी 2 लाख 47 हजार 103 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 35 हजार 58 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 66 हजार 242 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 18 हजार 678 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 51 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1249 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 23, नवी मुंबईमध्ये व पुण्यात प्रत्येकी 8, जळगावमध्ये 2, औरंगाबाद शहर, अहमदनगर जिल्ह्यात व नागपूर शहरात प्रत्येकी दोन , भिवंडी व पालघरमध्ये  प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील एक मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 35 पुरुष तर 16 महिला आहेत.आज झालेल्या 51 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत तर 19 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 51 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये (68 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील मंडळनिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका:  21,335 (757) 

ठाणे मंडळ एकूण: 26,646 (844)

नाशिक मंडळ एकूण: 1341 (83)

पुणे मंडळ एकूण: 4640 (232)

कोल्हापूर मंडळ एकूण: 216 (5)

औरंगाबाद मंडळ एकूण: 1121 (34)

लातूर मंडळ एकूण: 142 (6)

अकोला मंडळ एकूण: 522 (29)

नागपूर मंडळ एकूण: 387 (5)

इतर राज्ये: 43 (11)

एकूण:  35 हजार 58  (1249) 

आतापर्यंतचे सर्वाधिक 749 रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- 232, ठाणे- 59, पालघर- 3, नाशिक- 134, धुळे -14, जळगाव-2, नंदूरबार- 4, पुणे-165, सोलापूर-23, सातारा-6, सांगली व रत्नागिरी प्रत्येकी 1, औरंगाबाद- 27, हिंगोली-5, लातूर- 1, नांदेड- 5, अकोला- 40, यवतमाळ- 1, नागपूर- 26 रुग्ण सोडण्यात आले आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर), नवी दिल्ली यांनी देशातील 21 राज्यातील 69 जिल्ह्यांमध्ये कोविड 19 च्या अनुषंगाने समाजाधारित सिरो – सर्व्हे करण्याचे निश्चित केले आहे.  सदर सर्वेक्षण पार पाडण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्था आवश्यक तांत्रिक सहकार्य करत आहेत. या 69 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या 10 समूहांतील प्रत्येकी 40 जणांची अशी एकूण 400 लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ऍन्टीबॉडी) शोध या प्रकारे घेण्यात येणार आहे. कोविड 19 प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1,681 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14 हजार 41 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 60 लाख 47 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.