Maharashtra Corona Update : हजाराचा टप्पा ओलांडला, आज 1,201 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एक हजाराहून कमी कोरोना रुग्ण नोंदवले जात होते. पण, आज (बुधवारी) दिवसभरात रुग्ण संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला असून, आज 1,201 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक आज एकही ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली नाही.

 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 52 हजार 166 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 99 हजार 760 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 953 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यात सध्या 7 हजार 350 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 08 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आजवर 1 लाख 41 हजार 375 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 75 हजार 273 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 860 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत 6 कोटी 80 लाख 06 हजार 322 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

 

65 पैकी 35 ओमायक्रॉन रुग्ण बरे

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 65 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 35 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आजवर 632 नमुने जिनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले आहेत. सध्या 121 नमुन्याचा अहवाल प्रतिक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.