Maharashtra : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन (Maharashtra) समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाचा खंड 23, जनता 3-3, जनता खास अंक 1933 आणि इंग्रजी खंड 2 चा मराठी अनुवाद या नवीन चार ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणेचे खंड 4, खंड 12, खंड 15, खंड 17 (तीन भाग), खंड 18 (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नवीन आवृत्तीचे देखील प्रकाशन करण्यात आले.

Talegaon Dabhade : बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्र्कांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम (Maharashtra) मंत्री दादासाहेब भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री, संदीपान भुमरे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.