Maharashtra: Lok शाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण 30 दिवस बंद करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – Lok शाही मराठी वृत्तवाहिनीचा परवाना पुढील 30 दिवस निलंबित (Maharashtra)करण्यात आला आहे. 30 दिवस चॅनेलचे प्रसारण बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने दिले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने Lok शाही मराठी वृत्तवाहिनी (Maharashtra)आज 9 जानेवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद करण्याचा आदेश दिला आहे. लोकशाही मराठी वाहिनीच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणावर स्पष्ट मत मांडले जात होते. लोकांपर्यंत सत्य जावे असा या वाहिनीचा प्रयत्न होता. अभिव्यक्तीचा घटनात्मक अधिकार हुकूमशाही पद्धतीने केंद्र सरकारने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Pune : पुणे महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर

हा घटनाद्रोह, लोकशाहीद्रोह आहे.केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार व त्यांचे सर्व पत्रकार यांच्या समवेत आम्ही लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी व लोकशाहीचे सक्षमीकरण व्हावे यासाठी खांद्याला खांदा लावून रस्त्यावरचा लढा आम्ही लढू, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटले आहे.

Lok शाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, लोकशाही मराठीचा परवाना पुढील 30 दिवस निलंबित ! 30 दिवस चॅनेलचे प्रसारण बंद करण्याचे आदेश! #लढेंगे #जितेंगे

दरम्यान, यापूर्वीही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील बातम्या दाखविल्यानंतर तीन दिवस वाहिनी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने स्थगिती उठविली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.