Pune : उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – जास्त वेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे (Pune)यासाठी उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून इंजेक्शनच्या 30 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

किरण विठ्ठल शिंदे (वय 21, रा. भूमकर मळा, नऱ्हे गाव, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना माहिती मिळाली की, हडपसर परिसरात एक तरुण मेफेनटरमाईन सल्फेट आयपी (Mephentermine Sulphate Injection IP) हे उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी औषध प्रशासन विभागास माहिती दिली. हडपसर पोलिसांनी औषध प्रशासन विभागासह कारवाई करत किरण शिंदे याला ताब्यात घेतले.

Chinchwad : “जोडी तुझी माझी” कार्यक्रम रंगतदार ठरला

किरण शिंदे याच्याकडून मेफेनटरमाईन सल्फेट आयपी या इंजेक्शनच्या 30 बाटल्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. किरण हा 550 रुपयांना एक इंजेक्शन नशा करण्यासाठी विकत असल्याचे समोर आले. त्याच्याकडे अशा प्रकारे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना त्याने बेकायदेशीरपणे त्याची विक्री केली.

मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे महाविद्यालयीन मुले जिम मध्ये जास्तवेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे यासाठी याचा उपयोग करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशा औषधांचे परस्पर सेवन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.