Maharashtra News : वीज दरवाढीच्या निषेधार्थ राज्यातील ‘ फडणवीस सरकारचा’ तीव्र धिक्कार- गोपाळदादा तिवारी

एमपीसी न्यूज – विधानसभेत उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थ व ऊर्जा मंत्री (Maharashtra News) यांनी ‘वीज दरवाढीचा भार जनतेवर पडु देणार नाही’ असे तब्बल 2 वेळा सांगुन देखील तीन आठवड्यांचे आतच ‘एकनाथजी-देवेंद्रजी’चे  असंवैधानिक सरकार हे अखेर “फडणवीस सरकार” असल्याचेच पुन्हा सिध्द केले असून, त्याचा तीव्र धिक्कार काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी वीज दरवाढ विरोधी निवेदनात केला.

“अदानी पॅावरची ‘चौकशी प्रलंबित देणीमध्ये, ‘लोहार कोल ब्लॅाक’चा कोळसा न वापरता ही 10,500 कोटीचे गैरलागु देण्यासह 2014 ते 18 ची ‘वादग्रस्त थकबाकी’ देण्यासाठी राज्यातील जनतेवर 22 % ची वीज दरवाढ लादणाऱ्या राज्य सरकारचा गोपाळदादा तिवारी यांनी तीव्र धिकाःर केला व अजूनही 2018 नंतर ची अदानी पॉवर’ची थकबाकी देणी असल्याचे सांगीतले.

 

Pimpri : टोईंग व्हॅन उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षाकाठी पालिकेला मिळाले 96 लाख रुपये

 

2014-19मध्ये सवंग लोकप्रियतेच्या नादात 2014 अखेर वीज ग्राहकांकडे असलेली  14,000 कोटींची थकबाकी, तब्बल  5 वर्षे वसुल न केल्यामुळे ती मविआ सरकार सत्तेवर आली तेंव्हा 50,000 कोटींचे वर गेल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या भरमसाठ व्याजाचा बोजा देखील राज्यसरकारच्या डोक्यावर आल्याचे त्यांनी सांगीतले.

या जाचक व द्वीवर्षीय (23-24 व 24-25)च्या नियोजित दरवाढीमुळे ‘अदानी पॅावरला’ फायदा होईल . तसेच (Maharashtra News) राज्यात ही ऊद्योगधंदे येणार नाहीत,आणि आहेत ते ऊद्योगधंदे  30-40% महाग वीजे मुळे डबघाईला आले असून गुजरातला महाराष्ट्रा पेक्षा 40 % वीजदर स्वस्त असल्याने ते तिकडे जाण्याचा धोका संभवत असल्याचे सांगुन, दुर्दैवाने राज्यातील न्यायप्रविष्ट, महाराष्ट्रद्रोही ईडी सरकार महाराष्ट्राच्या हिताकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील  तिवारी यांनी केला.

 

‘महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा’(MERC)कडे, राज्यातील जनतेने विज दरवाढ विरोधी सुमारे 10,000 हून अघिक हरकती नोंदवल्या असून, वीज ग्राहक संघटनेने देखील तीव्र हरकत नोंदवली आहे. या मध्ये ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वतीने देखील आपण स्वतः हरकत नोंदवली असल्याचे’ तिवारी  स्पष्ट केले.

मोदी शहांच्या दबावामुळे ‘अदानींची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठीचे’ सर्व प्रयत्न ‘भाजप अंकीत राज्य सरकारे’ करीत असुन ‘शिंदे_फडणवीसांचा’चा शपथविधी झाल्या बरोबर लगेचच (दोघांच्याच् मंत्री मंडळाने) अदानी पॅावरचे सुमारे 7,000 कोटींचे देणे देण्याचा ‘सर्वप्रथम निर्णय’ घेतला हे देखील सत्तेवर येण्याचा ईडी सरकारचा हेतू स्पष्ट करतो, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.