Maharashtra : पुरंदर योद्धा मुरारबाजी देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर लाँच

एमपीसी न्यूज – अंकित मोहन यांच्या नवीन मुरारबाजी चित्रपटाचे शुक्रवारी (दि .14) पोस्टर लाँच (Maharashtra) झाले. हा चित्रपट पुरंदरच्या वेढ्यावर अवलंबून असल्याने सिनेप्रेमी या चित्रपटाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत.

किल्ले पुरंदर याचा वेढा व तह हा महाराष्ट्राच्या इतिहासातला मोठा भाग असूनही लोक सध्या त्याला विसरत आहेत.

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ यांच्या यशानंतर मुरारबाजी परत घेऊन येतोय महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या गाथांचा एक भाग.

पोस्टरमध्ये अभिनेता दोन्ही हातात रक्ताने माखलेल्या तलवारी घेऊन उभा आहे. तो धोतर नेसतो आणि त्याच्या खांद्यावर भगवा कवच आहे.

पुढे येणाऱ्या हजारो मुघल सैन्यासमोर तो निर्भीडपणे आणि निर्भयपणे उभा राहतो असे दाखवले गेले आहे .

Maharashtra : ‘पाहिजे जातीचे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

हे पोस्टर चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर प्रदर्शित केले असून चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया येतील ही अपेक्षा आहे.

याआधी अंकितने ‘फत्तेशिकास्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत म्हणजेच मुरारबाजी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात हरीश दुधाणे आणि प्राजक्ता गायकवाड यांच्याही भूमिका असणार आहेत.

मुरारबाजी यांच्याबाबत

मुघल सरदार दिलर खान याने इ.स. 1665 मध्ये पुरंदरला वेढा घालताना मुरारबाजींनी किल्ल्यावरून सैन्य घेऊन किल्ला लढवण्याची जबाबदारी घेतली होती.

किल्ला लढवणे त्यावेळी कठीण होते. परंतु त्या  कठीण परिस्थितीतही मुरारबाजी देशपांडे यांनी शत्रूंचा अतिशय शौर्याने सामना केला.

या लढाईत अवघ्या सातशे मावळ्यांसमोर दिलेरखानच्या पाच हजार सैन्याच्या तोंडचे पाणी पळाले. सुमारे दीड महिने लढल्यानंतर 11 जून 1665 रोजी दिलेरखानचा बाण मुरारबाजीला (Maharashtra) लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.