Maharashtra : राज्य सेवा मुख्य 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; विनायक नंदकुमार पाटील राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर (Maharashtra) करण्यात आली आहे. यामध्ये विनायक नंदकुमार पाटील या तरूणाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये राज्यातून अनिता विकास ताकभाते या तरूणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे आजच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि आजच एमपीएससीने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली होती. या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Pune : बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

एमपीएससीच्या 613 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुलाखतीचा अंतिम टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि राज्य सेवा परिक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

एमपीएससीच्या या निकालात राज्यातून विनायक नंदकुमार पाटील हा तरूण प्रथम आला आहे.धनंजय वसंत बांगर हा तरूण दुसरा आला आहे आणि सौरभ केशवराव गावंडे हा तरूण तिसरा आला आहे.मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिपा चांगदेव जेधे ही दुसरी आली आहे. सोनाली अर्जुनराव म्हात्रे ही तरूणी तिसरी आली आहे. एमपीएससीच्या या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण (Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.