Pune news : पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा रंगणार ; 10 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजन

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये यंदाची 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 10 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. (Pune news) या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 900 स्पर्धक सहभागी होणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि स्पर्धेचे मुख्य संयोजक, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Alandi News : संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त शालेय विद्यार्थ्यांद्वारे सिध्दबेट परिसर स्वच्छ

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच उदघाटन 10 जानेवारी 2023 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्या उपस्थित होणार आहे. तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या उपस्थित होणार आहे.

यंदाच्या स्पर्धेत राज्यातील 47 तालीम मधील 900 स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच यांना भरघोस अशी बक्षीस दिली जाणार आहेत. (Pune News) या स्पर्धेमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू आपल्या देशाच प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.