Pune News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम, 92 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा

एमपीसी न्यूज :  पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वांधिक 92 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Pune News) भाजपला 38 ठिकाणी विजय मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने 12 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला तीन ग्रामपंचायतींमध्ये विजय संपादन केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये प्रामुख्याने लढत होती. यात राष्ट्रवादीने 92 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. तसेच माजी आंबेगावात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते, इंदापूरात माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, मावळात सुनील शेळके, जुन्नरमध्ये अतुल बेनके यांनी आपापल्या तालुक्यांत ताकद कायम राखली असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद मर्यादित आहे.

Pune news : पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा रंगणार ; 10 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजन

त्यामुळे पालकमंत्र्यांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला. तरीदेखील भाजपला 38 ठिकाणी विजय मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने 12 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला तीन ग्रामपंचायतींमध्ये विजय संपादन केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तसेच भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यात अपेक्षेनुसार गड राखलेला आहे.

जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणाऱ्या 221 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील बिनविरोध आणि अपेक्षित अर्ज न आल्याने प्रत्यक्षात 176 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची निवड थेट जनतेमधून होणार होती.(Pune News) मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी कोणीही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे, तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 79 जागा रिक्त राहिल्या आहेत.

या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जाहीर होईल. त्यानंतरच या जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ग्रामपंचायत निकालाची अधिसूचना शुक्रवारी (23 डिसेंबर) तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत, असे जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.