Maval : संत गाडगे महाराजांचा समाजसेवेचा विचार रुजवण्यासाठी एनएसएस शिबिरे उपयोगी – डॉ. संभाजी मलघे 

एमपीसी न्युज – संत गाडगे महाराज यांनी दिलेला समाजसेवेचा विचार रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अत्यंत उपयोगी असल्याचे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इंद्रायणी महाविद्यालय (Maval) तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2022-23 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर मावळ तालुक्यातील कल्हाट या ठिकाणी आयोजित करण्यात आले. शनिवारी (दि. 17) शिबिराचे उद्घाटन डॉ. मलघे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी सरपंच विजया संतोष जाचक, उपसरपंच कविता पप्पू पवार व जावेद मुलानी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक जाधव,  प्रा. आर आर डोके,  प्रा. एस आर जगताप इत्यादी उपस्थित होते. उपस्थित प्रमुख अतिथी, अध्यक्ष, पाहुणे व ग्रामस्थ यांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.पी काकडे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले की संत गाडगेबाबा यांनी दिलेला समाजसेवेचा विचार रुजविण्यासाठी  राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत उपयोगी आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, उद्दिष्टे, योजनेतील  स्वयंसेवकाच्या योगदानाबाबत महत्त्व सांगून. त्यांनी भारतभर आणि महाराष्ट्रातील तसेच मावळ तालुक्यातील अनेक स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत आहे याचे उदाहरण दिले. यात इंद्रायणी महाविद्यालय अग्रेसर असून इंद्रायणी महाविद्यालयाचे 53 वे श्रमसंस्कार शिबिर होत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.आज असे लाखो स्वयंसेवक समाजाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, कटिबद्ध आहेत याचा प्राचार्य म्हणून सार्थ अभिमान आहे. राष्ट्रीय सेवा योजना हे  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी  मोठे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

Pune News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम, 92 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा

राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.दीप्ती पेठे यांनी प्रास्ताविकामध्ये 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सरपंच जाचक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा पुरविल्या असल्याचे सांगून ग्रामस्थ मोठ्या संख्येने शिबिरामध्ये उपस्थित राहणार असून शिबिरामध्ये होणारी व्याख्याने, शिबिरामध्ये होणारे श्रमदान, यामध्ये आम्ही सहभाग घेऊन गावातील कामे करू असे सांगितले.(Maval) उपसरपंच मुलानी यांनी शिबिरातील स्वयंसेवकांनी ग्राम जीवन समजून घेऊन शिबिराचा लाभ ग्रामस्थांना होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी प्रा. आर. आर. डोके यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती व त्यातील सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य अशोक जाधव  यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पालन करावे शिबिरातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन व्यक्तिमत्व विकास कसा साधावा याविषयी मार्गदर्शन केले.

या सात दिवसीय शिबिराचे आयोजन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने वतीने ,इंद्रायणी महाविद्यालयाने केले असून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री.रामदास काकडे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी  विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी कार्य करावे आणि आदर्श निर्माण करावा अशा  शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.दीप्ती पेठे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डी.पी.काकडे यांनी केले .तर आभार प्रा. डॉ. सुरेश थरकुडे यांनी मानले.(Maval) शिबिरामध्ये महाविद्यालयातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.