Pimpri news : पवनामाई महोत्सव व जलमैत्री अभियानाला सुरुवात, विविध कार्यक्रमांच आयोजन

एमपीसी न्यूज : पवनामाई महोत्सव व जलमैत्री अभियानाला (Pimpri news) सुरुवात झाली आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं.

जलदिंडीचे अध्यक्ष, डॉ. विश्वास येवले,  पत्रकार, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या 90.4 एफएम चे रेडिओ जॉकी विराज सवाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे सूर्यकांत मुथियान व इतर असे एकूण 56 जणांच्या टिमने पवना नदीच्या उगम स्थानाजवळ जाऊन पवना नदीचे पाणी आणले.

13वी जलदिंडी पवनमाई जलमैत्री अभियान आणि 23 व्या पवनामाई महोत्सवाची सुरुवात पवनानगर येथे करण्यात आली. परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी येथे उपस्थित होते. (Pimpri news) येथे नदीचे पूजन करण्यात आले, पवनामाईची आरती करण्यात आली व विद्यार्थ्यांना नदी संवर्धनाची शपथ देण्यात आली. त्यानंतर  साळूंबरे येथे पवना नदीमध्ये कंकेचे दिवे सोडून आजच्या कार्यक्रमांचा समारोप  करण्यात आला.

Pune News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम, 92 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा

उद्या सकाळी हे सर्वजण साळूंबरे येथून बोटीने निघतील व रावेत बंधर्याजवळ येतील. चिंचवड येथील जिजामाता उद्यानाजवळ नदी वाचवण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात येईल. या मानवी साखळी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील शाळा व कॉलेजचे 700 ते 800 विद्यार्थी सहभागी होतील.

शिवाजी तांबे, सेवानिवृत्त, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य व सेवानिवृत्त अध्यक्ष, मराठी भाषा समिती बालभारती व ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना पवनामाई जलमैत्र पुरस्कार देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.